
धारावी पोलिसांची धडाकेबाज कारवाई बोगस दारूसाठा, एमडीसह दोघांना अटक ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
मुंबई : बाेगस दारुसाठा करणाऱ्या व ड्रग्स बाळगणाऱ्या दोन जणांना शुक्रवारी अटक करण्यात आली. दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये दोन लाख ४२ हजार ८१५ रुपयांचा बोगस दारुसाठा व दोन लाख ६० लाखांचे एमडी व २ मोबाईल असा ५ लाख रूपयांचा मुद्देमाल आढळून आला, अशी मािहती परिमंडळ ५ चे उपायुक्त प्रणय अशोक यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, रमजान ईदसाठी धारावी पोलिसांचा विशेष पोलीस बंदोबस्त राबवला होता. बंदोबस्त सुरू असताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अंजली वाणी यांना खबऱ्याने बोगस दारुसाठा करणाऱ्याची मािहती दिली. सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी धारावी परिसरातील महाराणा प्रताप येथील रॉयल बॅकरी जवळील एका रुममध्ये धाड टाकली. त्यावेळी ब्रँडेड कंपन्यांच्या ६० दारूच्या बाटल्या व ४५ रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. त्या बाटल्यांमध्ये दारू भरून बाटल्या सिल केल्या जात होत्या. या प्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दााल करून रवी हौसी परमार याला अटक करण्यता आली.
दरम्यान, दुसऱ्या कारवाईत बंदोबस्तावरील धारावीपोलिसांना पाहून पीएमएजी कॉलनी परिसरात एक इसम पळू लागला. पोलिसांना संशय आल्याने त्या इसमाला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ४४ ग्रॅम एमडी व २ मोबाईल आढळून आले. ड्रग्स बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून इम्रान फारूख शेख ऊर्फ बॉक्सर (३६) याला अटक करण्यात आली.
सदरची कामगिरी मध्य प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, परिमंडळ ५ चे उपायुक्त प्रणय अशोक, कुर्ला विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश जाधव, धारवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस िनरीक्षक गुलाब पाटील, पोलीस िनरीक्षक विजय माने, पोलीस निरीक्षक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंजली वाणी, हवालदार कटके, पोलीस नाईक झडे, शिंदे, वारीक, सुर्वे, पोलीस अंमलदार पाटील, महाजन, कुभार आदी पोलीस पथकाने केल्या आहेत.