पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडून पोलिस महासंचालक पदक” जाहीर झाले

पोलीस महानगर  : परवेज शेख

मा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडून “पोलीस महासंचालक पदक” करिता महाराष्ट्र राज्यातुन उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे प्रस्ताव मागविण्यात येतात व त्यातून छाननी करून निष्कलंक उत्कृष्ट सेवा व कर्तव्य बजाविणाऱ्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह “पोलीस महासंचालक पदक” 01 मे “महाराष्ट्र दिन” चे औचित्य साधून आदरपूर्वक प्रदान करून सन्मानित करण्यात येते.

पोलीस हवलदार इकबाल अ. रशीद शेख, सीसीटीएनएस विभाग, सोलापूर ग्रामीण यांनी 17 वर्षाच्या सेवा कालावधीमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये वैयक्तिक सहभाग घेऊन 10 सुवर्ण, 07 रौप्य, 11 कास्य पदके, वरिष्ठ अधिकारी यांचेकडून 20 प्रशंसापत्रे, विविध विषयांवरील ऑनलाइन स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन 15 प्रमाणपत्रे तसेच सीसीटीएनएस प्रणाली मध्ये वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी मध्ये 01 कास्य पदक व राष्ट्रीय गुन्हे अभिलेख केंद्र नवी दिल्ली यांचेकडून 01 राष्ट्रीय पारितोषिक व सन्मान चिन्ह, सोलापूर ग्रामीण जिल्ह्यास सीसीटीएनएस प्रकल्पांतर्गत उत्कृष्ट कामगिरी मध्ये महाराष्ट्र राज्यात तृतीय क्रमांकाचे फिरते चषक, सीसीटीएनएस प्रणालीमध्ये वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी मध्ये 01 कास्य पदक, अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळावा 2019 लखनऊ उत्तर प्रदेश येथे सुवर्णपदकासह भारत देशात प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळविल्याबद्दल मा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्याकडून 1,00,000/- रु. चे रोख बक्षीस असे अनेक पारितोषिक पटकावून उत्कृष्ट सेवा बजाविल्याबद्दल पोलीस हवालदार इकबाल अ. रशीद शेख यांना दिनांक 30/04/2021 रोजी मा. पोलीस महासंचालक यांच्या आदेशान्वये “पोलीस महासंचालक पदक” प्रदान करण्यात आली आहे.

त्यांच्या या अतुलनीय सेवेबद्दल व मिळविलेल्या यशाबद्दल पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अतुल झेंडे, पोलीस उपाधीक्षक (मुख्या) श्री. सूर्यकांत पाटील व सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांच्याकडून शुभेच्छा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: