
पोलीस महानगर : परवेज शेख
शिरूर गोळीबार प्रकरणातील NK साम्राज्य ग्रुपचा कुख्यात मोक्यातील आरोपी गणेश चंद्रकांत कुर्लप याला स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद
दिनांक : 19/04/2021 रोजी मा.पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे आदेशानुसार पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पाहिजे/फरारी असलेल्या आरोपी यांचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार शिरूर तालुक्यात रामलिंग रोड येथे पेट्रोलिंग करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख श्री पद्माकर घनवट यांना बातमी दारामार्फत गोपनीय माहिती मिळाली की दिनांक 26/01/2021 रोजी सी.टी बोरा कॉलेज रोडवर मोटरसायकलवर येऊन प्रवीण गोकुळ गव्हाणे या युवकावर गोळीबार करून पसार झालेला मोक्यातील आरोपी इसम नामे गणेश चंद्रकांत कुर्लप रा.शिरूर जि.पुणे हा रामलिंग रोड येथे येणार असल्याचे समजले लागलीच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी गेले असता गणेश चंद्रकांत कुर्लप याला रामलिंग रोड येथे अटक करण्यात आली तसेच सदर आरोपीवर यापूर्वी शिरूर पोलिस स्टेशन येथे खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
1) C.R No. 33/2013, IPC 307,341,141,143,147,148,504,506.
2) C.R No. 514/2016 IPC 302,143,147,148,149,109,120(B)
3) C.R No. 59/2021 IPC 307,143,147,148,149,341,120(B),109, Arm Act 3,4,25,27 सह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3(1)(ii),3(4) वरीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.सादर आरोपी हा जानेवारी महिन्यातील जीवघेण्या गोळीबार प्रकरणापासून फरार होता.
सदर आरोपी पुढील कार्यवाही साठी शिरूर पोलिस स्टेशन यांच्या ताबेत दिला आहे
सदरची कारवाई मा.श्री अभिनव देशमुख पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण,श्री.मिलिंद मोहिते अप्पर पोलिस अधीक्षक,श्री.अमृतराव देशमुख उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड , यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे पोसई रामेश्वर धोडगे पोसई हनुमंत पडळकर सहा.फौ दत्तात्रय गिरिमकर पोहवा जनार्दन शेळके पोना.राजू मोमीन पो.ना अजित भुजबळ पो.ना मंगेश थिगळे पो.कॉ प्रसन्नजीत घाडगे पो.ना दिनेश कुंभार पो.कॉ प्रवीण पिठले पो.कॉ विशाल कोथळकर मपोका गव्हळी पो.कॉ अरुण पवार यांनी केली.