जेसीबी मशीन चे ब्रेकर चोरी करणाऱ्याएकास स्थानिक गुन्हे शाखे कडून अटक

पोलीस महानगर  : परवेज शेख
जेसीबी मशीन चे ब्रेकर चोरी करणाऱ्याएकास स्थानिक गुन्हे शाखे कडून अटक
शिक्रापूर पोलीस स्टेशन गुरनं196 /2021भा .द.वि कलम 379 नुसार गुन्हा नोंद झाला होता सदर चा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना वरिष्ठांनकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्या होत्या.
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचा गुन्हा हा महादेव अंबादास शेळके राहणार आवळवाडी मोरे वाडा वाघोली तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी केला असल्याची गोपनीय बातमी दाराकडून माहिती मिळाल्याने इसम नामे महादेव अंबादास शेळके राहणार आवळवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे यास लोणीकंद पोलिस स्टेशनचे वो हवा बाळासाहेब सकाटे पो काँ ऋषिकेश व्यवहारे यांचे मदतीने सापळा रचून ताब्यात घेतले असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्याने दिनांक 23 /3 /2019 रोजी लोणीकंद पुणे शहर यांचे हद्दीतून अशाच प्रकारचे जेसीबी मशीनचे आणखीन एक ब्रेकर चोरी करून नेल्याची कबुली दिली आहे सदर बाबत लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर गु र नंबर 179/21 भादवि 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदर आरोपीकडून गुन्हा करतेवेळी वापरण्यात आलेली जेसीबी मशीन ,सणसवाडी इथून चोरलेले जेसीबी मशीनची ब्रेकर , लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर हद्दीतून चोरलेले जेसीबी मशीन ब्रेकर असा एकूण 27,00,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
गुन्हे उघड
1) शिक्रापूर पो स्टे गु र क्र 196/2021 भादंवि 379
2) लोणीकंद पो स्टे गु र क्र 179/2021 भादंवि 379
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण मा.श्री अभिनव देशमुख सो मा. अप्पर पोलीस अधिक्षक मोहिते सो,यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली
API सचिन काळे
ASI दत्तात्रय गिरमकर
HC उमाकांत कुंजीर
HC जनार्दन शेळके
PN राजू मोमीन
PN अजित भुजबळ
PN मंगेश थिगळे,
PC अक्षय जावळे
यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
%d bloggers like this: