कुख्यात गुंड निलेश बसवंत यास गुन्हे शाखा युनिट-१ ने केले जेरबंद

पोलीस महानगर  : परवेज शेख

पुणे, दि. ३१ मार्च : मोक्यातून जामीन मिळवण्यासाठी आजारपणाची बनावट कागदपत्रे बनवून मा. न्यायालयाची दिशाभूल करणारा कुख्यात गुंड निलेश बसवंत यास गुन्हे शाखा युनिट-१ ने जेरबंद केले आहे.

बापू नायर आणि त्याचे साथीदार असलेले निलेश बसवंत, अमोल बसवंत, दीपक कदम, दत्ता माने, नितेश बसवंत यांच्याविरुद्ध कोंढवा पोलीस स्टेशन येथे २०१५ साली गुन्हा दाखल करून त्यांच्यावर मोका कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी निलेश बसवंत याला ऑगस्ट २०१६ मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो ऑक्टोबर २०२० पर्यंत येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत होता. कारागृहामध्ये असताना त्याने आपल्याला गंभीर आजार झाला असल्याचे सांगून, आजारपणाबाबतची खोटी कागदपत्रे तयार करून ती कोर्टात सदर केली होती. त्यावेळी कोर्टाने त्यास आजारपणावर उपचार करण्यासाठी पॅरोलवर सोडले होते. त्यांनतर आरोपी निलेश बसवंत याने कोर्टात सदर केलेली सातारा येथील डॉ. अंदुरे, ऑनको लाईफ कॅन्सर सेंटर शेंद्रे यांच्याकडील लेटरहेडवर जे वैद्यकीय प्रमाणपत्र तयार केले होते ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याअनुषंगाने तपास करीत असताना आज दि. ३१ मार्च रोजी गुन्हे शाखा युनिट-१ चे पोलीस अंमलदार अमोल पवार यांना आरोपी निलेश बसवंत हा त्याच्या घरच्यांना भेटण्यासाठी खेड शिवापूर येथील दर्ग्याजवळ येणार असल्याची बातमी मिळाली. त्याप्रमाणे युनिट-१ कडील अधिकारी व अंमलदार यांनी खेड शिवापूर येथील दर्ग्याजवळ सापळा रचून बसवंत यास पकडले. तसेच त्यास पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

निलेश बसवंत याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, खंडणी, जमीन बळकावणे, पिस्टल बाळगणे अशा प्रकारचे एकूण १२ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर दोन वेळा मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

सदरची कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह-आयुक्त रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, गुन्हे-१क्गे सहा. पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाख युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील ताकवले, पोलीस उप निरीक्षक सुनील कुलकर्णी, पोलीस अंमलदार अमोल पवार, अजय थोरात, योगेश जगताप, इम्रान शेख, तुषार माळवदकर, अय्याज दड्डीकर, महेश बामगुडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
%d bloggers like this: