
प्रतिबंधित गुटख्यांनीभरलेले दोन कंटेनर व दोन टेम्पो डोंगरी पोलिसांकडून जप्त
माननीय महोदय ,जय हिंद
आज रोजी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश दिनकर , पोलीस उपनिरीक्षक स्नेहलसिंग खुळे, पोलीस उपनिरीक्षक आरफत सिद्दिकी पो.हवा/सावंत पो. ना/ थोरात, पो. शि/ गणेश कांबळे, पो. शि/ इम्रान मुल्ला पो. शि.राजू पवार असे पोलिस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना तीन वाजण्याच्या सुमारास चिन्मय इंटरप्राईजेस, कल्याण स्ट्रीट पार्किंग ,वाडी बंदर ,मुंबई याठिकाणी गस्त करीत असताना दोन कंटेनर , छोटा दोन छोटा हत्ती टेम्पो, हा संशयित रित्या उभा असलेला दिसला म्हणून नमूद पथकासह नमूद कंटेनर व टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित असलेला गुटका मिळून आला.
म्हणून सदर बाबत वरिष्ठांना माहिती देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भागडीकर, पोलीस निरीक्षक शशिकांत पाडवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम, यांनी भेट देऊन पाहणी केली व अन्न व औषध प्रशासन विभागाला सदर बाबत माहिती देऊन सदरचे कंटेनर व टेम्पो प्रतिबंधित गुटके सह त्यांच्या ताब्यात देण्यात आले त्याचे वर्णन खालील प्रमाणे
4600000/- रुपये कि. गुटखा
(संदीप भागडीकर )
डोंगरी पोलीस ठाणे मुंबई