
मोबाईल स्नॅचर पोलिसांच्या ताब्यात
पुणे : परवेज शेख
पुणे, दि. २ ऑक्टोबर मोबाईल स्नॅचिंग करणारे अट्टल अलंकार पोलिसांच्या ताब्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, अलंकार पोलीस ठाण्याच्या तपास पथकाच्या कर्मचाऱ्यांना मिळालेल्या बातमीनुसार,अभिषेक लेकावळे (वय २०, रा. नर्हे), अभिषेक साळुंके (वय १९, रा. नर्हे) यांनी सदरचा गुन्हा केल्याची माहिती मिळाल्याने पथकातील कर्मचारी व अधिकारी यांनी त्यांच्या रहात्या पत्त्यावरून त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी वारजे पोलीस स्टेशन, सिंहगड रोड, डेक्कन व भारती विद्यापीठ या सर्व पोलीस स्टेशनामध्ये मिळून ६ मोबाईल स्मार्ट फोन स्नॅच केल्याचे कबूल केले. सदर गुन्ह्यात ७ स्मार्ट फोन व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल धरून १,३५,०००/- रुपयांचा माल जप्त केला आहे.
सदर कारवाई दक्षिण प्रादेशिक विभागचे अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, परिमंडळ ३ च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सिंहगड विभागाचे अपर पोलीस आयुक्त पी. डी. गायकवाड, अलंकार पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस आयुक्त कल्पना जाधव, गुन्हेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फौजदार सुरज गोरे, पोलीस नाईक बाबुलाल तांदळे,प्रफुल चव्हाण, राजेंद्र लांडगे, किरण राऊत, संदीप धनवटे, योगेश बडगे, तन्वीर शेख, शरद चव्हाण यांनी केली आहे.