
बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगणाऱ्या सराईताला अटक
पुणे : परवेज शेख
बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली.
सुजित मीनानाथ देवकुळे, (वय 32 वर्ष, रा.स. नं. 649, विघ्नहर्ता नगर, बिबवेवाडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुन्हे शाखा युनिट 1 चे अरूण वायकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस उपनिरीक्षक बुदगुडे, पोलीस हवालदार अजय थोरात, पोलीस नाईक अमोल पवार, मल्लिकार्जुन स्वामी, पोलीस शिपाई तुषार माळवदकर पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या माहितीवरून सुजित देवकुळे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीनसह 02 जिवंत काडतुसे व रॅम्बो चाकू असा ३७ हजार ४०० रुपयांचा ऐवज ताब्यात घेण्यात आला. त्याच्या विरोधात आर्म ऍक्ट कलम 3(25), 4(25) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) सह प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
Superb work….