मृत आजी-आजोबांचे घर लाटण्यासाठी बनावट कागदपत्रे

मृत आजी-आजोबांचे घर लाटण्यासाठी बनावट कागदपत्रे

मुंबई : मृत आजी-आजोबांचे घर लाटण्यासाठी बनावट कागदपत्रांद्वारे ६७ लाखांचे कर्ज घेतल्याचा प्रकार बोरीवलीत उघडकीस आला. या प्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोरीवलीतील २० वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ती महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. तक्रारीनुसार २०१३ मध्ये आजीचे निधन झाले. आजीच्या नावे बोरीवलीत फ्लॅट आहे. त्यांच्या निधनानंतर तो फ्लॅट आजोबांच्या नावावर झाला. २०१६ मध्ये आजोबांचे निधन झाले. आजोबांनी तो फ्लॅट तरुणीसह तिच्या चुलत भावाच्या नावावर केला. चुलत भाऊ परदेशात होता.त्याला पैशांची आवश्यकता असल्याने, काकांनी आजोबांच्या घरावर कर्ज घेण्याचे ठरविले. तरुणीनेही होकार दिला. मात्र, प्रत्यक्षात काकांनी दाखविलेली कागदपत्रे कर्जाची नसून घर विक्रीची असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. तिने याबाबत जाब विचारल्यावर उडवाउडवीची उत्तरे मिळाली. पुढे काही दिवसांनी बँकेचे हफ्ते थकविले म्हणून बोरीवलीच्या घराच्या पत्त्यावर पत्र आले. तिने बँकेत चौकशी केली तेव्हा हा प्रकार उ़घडकीस आला,

Leave a Reply

Your email address will not be published.

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
error: Content is protected !!
%d bloggers like this: