घरफोडी करणारी टोळी जेरबंद

घरफोडी करणारी टोळी जेरबंद

पुणे : परवेज शेख

बारामती : शहरात तीन दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडीच्या घटनेत सीसीटीव्हीमुळे शहर पोलिसांच्या हाती टोळी लागली असून त्यांच्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. निलेश मुकेश भोसले व रोहित मुकेश भोसले (वय २०, रा. कचरे वस्ती पाण्याच्या टाकी जवळ, हजापुर ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे असून त्यांना सटवाजी नगर येथून ताब्यात घेण्यात आले.
शहरातील गणेश भाजी मंडई व त्याच्याबाहेर असणाऱ्या नगरपालिकेच्या कॉम्प्लेक्स येथील एक चपलांचे दुकान व दोन पानपट्ट्या फोडून चोरट्यांनी आतील माल व रोकड चोरुन नेली होती. या प्रकरणी स्नेहांकीत भारत शिंदे, मन्सूर सिकंदर शेख, रमजान सिकंदर शेख यांनी शहर पोलिसांकडे फिर्याद दिली होती.
बारामती शहर व आसपासच्या ग्रामीण भागात शहर पोलीस स्टेशच्या गुन्हे शोध पथकाने शोध घेतला. सीसीटीव्ही तपासून त्याच्या मदतीने व वर्णनावरून अवघ्या आठ तासाच्या आत आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.
आरोपींकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी चोरीची कबुली दिली. आरोपींकडून ९७२० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली पहार, कटावणी ही शस्त्र देखील जप्त करण्यात आली आहेत. उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सतीश अस्वर, सहायक फौजदार संदीपान माळी व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुलिस महानगर न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की। आप संपर्क करे मो० न० 7400225100,8976727100
%d bloggers like this: