‘फॅब कप’ फुटबॉल स्पर्धेत तरुणाईचा उत्साह; क्रीडा संस्कृती जपणाऱ्या उपक्रमाचे महापौर रितू तावडेकडून कौतुक

‘फॅब कप’ फुटबॉल स्पर्धेत तरुणाईचा उत्साह; क्रीडा संस्कृती जपणाऱ्या उपक्रमाचे महापौर रितू तावडेकडून कौतुक

रवि निषाद / मुंबई

मुंबई : आदिल बॉईज अँड फ्रेंड्स असोसिएशन यांच्या वतीने टिळक नगर येथील ऐतिहासिक लाल मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘फॅब कप’ फुटबॉल स्पर्धेला महापौर रितू तावडे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत स्पर्धेच्या आयोजनाचे कौतुक केले.

स्पर्धेदरम्यान मैदानावरील चुरशीचे सामने आणि खेळाडूंचा उत्साह अनुभवताना वेगळाच आनंद मिळाल्याची भावना महापौर तावडे यांनी व्यक्त केली. फुटबॉल हा केवळ खेळ नसून तरुणांना एकत्र आणणारा, सांघिक भावना आणि मैत्री वृद्धिंगत करणारा प्रभावी दुवा असल्याचे त्यांनी सांगितले.

‘फॅब कप’च्या माध्यमातून मुंबईतील उदयोन्मुख खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत असून त्यांच्या कौशल्याला वाव मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. अशा स्पर्धांमुळे क्रीडा संस्कृती जिवंत राहत असून तरुणाईला सकारात्मक ऊर्जेकडे वळविण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या आदिल बॉईज अँड फ्रेंड्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांना आणि युवा फुटबॉलपटूंना पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon