मनिषा हवालदारकडे सापडला नीट पेपर फुटीचा ‘गुप्त’ खजिना; सीबीआयच्या हाती लागलेल्या पुराव्यांनी बड्या लोकांची झोप उडाली

मनिषा हवालदारकडे सापडला नीट पेपर फुटीचा ‘गुप्त’ खजिना; सीबीआयच्या हाती लागलेल्या पुराव्यांनी बड्या लोकांची झोप उडाली

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे – देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट (वैद्यकीय प्रवेश परीक्षा) पेपर फुटी प्रकरणात आता केंद्रीय अन्वेषण विभागाच्या तपासातून अत्यंत धक्कादायक आणि मोठे खुलासे समोर आले आहेत. सीबीआयने अटक केलेली आरोपी मनिषा हवालदार हिने नीट परीक्षेचे तिन्ही विषयांचे पेपर आणि प्रश्न पुरवण्यासाठी अनेक विद्यार्थी आणि पालकांकडून लाखो-कोट्यवधी रुपये उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या नव्या खुलाशामुळे वैद्यकीय क्षेत्रासह शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

सीबीआय च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषा हवालदार हिच्या घरात आणि कार्यालयात केलेल्या झाडाझडतीत काही अत्यंत संवेदनशील पुरावे हाती लागले आहेत. तिने नॅशनल टेस्टिंग एजन्सी चे काही अतिशय महत्त्वाचे आणि गोपनीय दस्तऐवज बेकायदेशीरपणे स्वतःकडे लपवून ठेवले होते. यासह पेपर फुटीच्या रॅकेटमधील इतर मुख्य आरोपींची ओळख पटवणारी महत्त्वाची कागदपत्रेही सीबीआयने जप्त केली आहेत. मनिषाच्या खात्यांची तपासणी केली असता, या पेपर फुटी प्रकरणाशी संबंधित अनेक संशयास्पद आणि मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मनिषा हवालदारने ज्या विद्यार्थी आणि पालकांकडून पैसे घेऊन पेपर पुरवले होते, त्यांची संपूर्ण यादी आता सीबीआयच्या हाती लागली आहे. त्यामुळे या संपूर्ण गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्या इतर विद्यार्थी आणि पालकांचीही आता सीबीआय कसून चौकशी करणार आहे. बेकायदेशीर मार्गाने परीक्षा पास होऊ पाहणाऱ्या अनेक बड्या घरातील पालकांचे धाबे यामुळे दणाणले असून, या प्रकरणात लवकरच आणखी काही मोठ्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.

मनीषा हवालदार या नीट परीक्षा घेणाऱ्या एनटीएमध्ये पेपर सेटर म्हणून काम करत होत्या. फिजिक्स विषयाचे प्रश्न काढण्याची जबाबदारी हवालदार यांच्यावर होती. शुक्रवारी त्यांना अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. मनीषा हवालदार यांनी आधीच अटकेत असलेली आपली साथीदार मनीषा मांढरे यांच्याशी संगनमत करून नीट परीक्षेचा पेपर फोडल्याचा आरोप आहे.

तपासा दरम्यान, सीबीआयला मनिषा हवालदारच्या मोबाईलमध्ये संशयास्पद चॅट आढळलं आहे. त्यांच्या मोबाईलमध्ये ‘गॉड’ नावाने एक मोबाईल क्रमांक सेव्ह आहे. हा ‘गॉड’च नीट पेपर फुटीचा ‘गॉडफादर’ असावा, असा संशय सीबीआयला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon