जळगाव जिल्ह्यात प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

जळगाव जिल्ह्यात प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर 

जळगाव – नाशिकमधील भोंदू अशोक खरातप्रकरणानंतर राज्यातील काही जिल्ह्यातही महिलांवरील अत्याचार आणि व्हिडिओची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील एका युवकानेही अशाच प्रकारे मुलींसोबत लैंगिक अत्याचार करुन व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर आरोपीस अटक केली आहे. आता, प्रेम प्रकरणातून तरुणीला जाळ्यात ओढत तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, पीडितेकडून ७ लाखांची वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील यश जैन या तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर, तरुणाच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्यात अजूनही काही तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आल्याने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील लैंगिक अत्याचार आणि व्हायरल व्हिडिओप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव यश महेंद्र जैन असे असून त्याला कोर्टात हजर करण्यात आले आहे. चाळीसगावातील तरुणी ब्लॅकमेल प्रकरणात आता नवे तपशील समोर येत आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी यश महेंद्र जैन याच्या मोबाईलमध्ये इतरही काही मुलींचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ आढळल्याची प्राथमिक माहिती समोर आली. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. या संदर्भात प्रतिक्रिया देताना पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी सांगितले की, “तपास सुरू असून काही फोटो व व्हिडिओ आमच्या हाती लागले आहेत. मात्र, याबाबत अंतिम निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतरच काढता येईल.”

दरम्यान, पोलिसांकडून आरोपीच्या मोबाईलमधील डिजिटल पुराव्यांची सखोल तपासणी सुरू असून या प्रकरणात आणखी इतर मुलींना ब्लॅकमेलिंग झाली आहे का?, याचाही शोध घेतला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी यश जैन याला कोर्टात हजर केली आहे. मात्र, या व्हिडिओ कांडमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon