गहाळ ५ मोबाईल शोधून नारपोली पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; नागरिकांचा विश्वास अधिक दृढ

गहाळ ५ मोबाईल शोधून नारपोली पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; नागरिकांचा विश्वास अधिक दृढ

भिवंडी : नारपोली पोलीस स्टेशन हद्दीत गहाळ झालेल्या विविध कंपनींच्या ५ मोबाईल फोनचा यशस्वी शोध घेत पोलीस शिपाई/2468 विजय ताठे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या कमी वेळेत हे मोबाईल शोधून काढण्यात आले आणि संबंधित मूळ मालकांना परत करण्यात आले.

या कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला असून, नारपोली पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. गहाळ वस्तू परत मिळाल्याने संबंधित नागरिकांनीही समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले.

पोलीस शिपाई विजय ताठे यांच्या या कार्यक्षम आणि प्रामाणिक कामगिरीमुळे नारपोली पोलीस स्टेशनच्या कार्यपद्धतीबाबत सकारात्मक संदेश समाजात पोहोचला आहे. तात्काळ आणि प्रभावी कारवाईमुळे पोलीस दलाची जनसेवा अधिक अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon