विलेपार्ले मुंबई विमानतळावरील टर्मिनल एक वर आगीची घटना; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

Spread the love

विलेपार्ले मुंबई विमानतळावरील टर्मिनल एक वर आगीची घटना; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबई विमानतळावर आग लागल्याची घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली, विलेपार्ले मुंबई विमानतळावरील टर्मिनल एक वर ही आग लागल्याची घटना घडली.शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज असून गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

आगीची माहिती मिळताच विमानतळ पोलिस, महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात आले आहे.
आग लागल्यानंतर विमानतळावरील प्रवाशांचीही धांदल उडाली होती, तर काही प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये ही घटना कैद केल्याचं दिसून आलं.दरम्यान, अग्निशन दलाची बंब आल्यानंतर अग्निशमनच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

आगीच्या घटनेनं विमानतळ परिसरात धुराचे लोळ पसरले होते, तर प्रवाशांच्या लाँजमध्येही धुराचे लोळ आल्याने प्रवाशांनी तोंडावर हात ठेऊन, रुमालाचे झाकून बचाव केला.अखेर आग आटोक्यात आणण्यात यश आले असून याचा विमानसेवेवर कुठलाही परिणाम झाला नाही. आपत्कालीन प्रतिसाद पथकांनी अवघ्या काही मिनिटांतच या आगीवर त्वरित नियंत्रण मिळवले. विमानतळाचे कामकाज सुरळीत सुरू आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon