नियंत्रण सुटल्याने कार उलटली केजच्या तहसीलदार राकेश गिड्डेंचा जागीच मृत्यू; बीड जिल्ह्यात हळहळ

Spread the love

नियंत्रण सुटल्याने कार उलटली
केजच्या तहसीलदार राकेश गिड्डेंचा जागीच मृत्यू; बीड जिल्ह्यात हळहळ

योगेश पांडे / वार्ताहर

बीड – लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ गुरूवारी सकाळी झालेल्या भीषण कार अपघातात केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत होते. यावेळी त्यांची गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाली. अपघाताची तीव्रता इतकी जबरदस्त होती की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनातून मृतदेह बाहेर काढून तो उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. या अपघाताबाबत अधिक तपास सुरू असून, नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गिड्डे यांच्या निधनामुळे महसूल विभागात हळहळ व्यक्त केली जात आहे.

केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे गुरुवारी पहाटे सुमारे ५ वाजता लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले. कर्तव्यदक्ष आणि तरुण महसूल अधिकाऱ्याचा अचानक झालेल्या या मृत्यूमुळे बीड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत असताना वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

रेणापूर पोलिसांच्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी गिड्डे कारमध्ये एकटेच होते. पहाटेच्या सुमारास वेगात असताना अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, त्यात गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला. आवाज ऐकून स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत त्यांचा जीव गेला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर ग्रामीण रुग्णालयात हलवला. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत.

धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, केज तहसीलदारांच्या अपघाती निधनामुळे आज आम्ही साध्या पद्धतीने आमचा उमदेवारी अर्ज दाखल करणार आहोत. संतोष देशमुख यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे, ज्याचा माणूस गेला त्यालाच ते दुःख कळते. आमच्या वहिनी अश्विनी देशमुख यांच्यासोबत संपूर्ण गावांनी रावा आणि गावाचा विकास करून घ्यावा असे आमचे आवाहन असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon