डोंबिवलीत सामूहिक अत्याचाराची धक्कादायक घटना; तीन रिक्षाचालक अटकेत

Spread the love

डोंबिवलीत सामूहिक अत्याचाराची धक्कादायक घटना; तीन रिक्षाचालक अटकेत

पोलीस महानगर नेटवर्क

डोंबिवली : टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली असून, २२ वर्षीय तरुणीवर तीन रिक्षाचालकांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीला फसवून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच टिळकनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चेतन चव्हाण, हेमंत चव्हाण आणि उमेश वर्मा या तीन आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी करून तिचा जबाब नोंदवला असून, आरोपींविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon