सायन रुग्णालय पुनर्विकासाला प्रारंभ; आधुनिक आरोग्य सुविधांकडे मोठे पाऊल

Spread the love

सायन रुग्णालय पुनर्विकासाला प्रारंभ; आधुनिक आरोग्य सुविधांकडे मोठे पाऊल

सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय (सायन) येथील नव्या इमारतीच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. मुंबईतील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम व आधुनिक करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

या कार्यक्रमाला आमदार कॅप्टन आर. तमिल सेल्वन, आमदार प्रसाद लाड, आमदार कालिदास कोळंबकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे तसेच भाजपचे उपाध्यक्ष रवी राजा यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुनर्विकासानंतर रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, वाढीव खाटांची क्षमता, अधिक सक्षम आपत्कालीन सेवा आणि रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी सुधारित सुविधा उपलब्ध होणार आहेत. सध्या दररोज हजारो रुग्णांवर उपचार करणाऱ्या या रुग्णालयावर वाढत्या लोकसंख्येमुळे ताण वाढला असून, त्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प आवश्यक मानला जात होता.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी या प्रकल्पामुळे सर्वसामान्यांना अधिक दर्जेदार आरोग्य सेवा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon