सिद्धीविनायक मंदिरातील दानपेटीवर कर्मचाऱ्याचाच डल्ला; घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी कर्मचाऱ्याला बेड्या

Spread the love

सिद्धीविनायक मंदिरातील दानपेटीवर कर्मचाऱ्याचाच डल्ला; घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी कर्मचाऱ्याला बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात चोरीची घटना उघड झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मंदिरातील कर्मचाऱ्यानेच या दानपेटीच्या पैशांवर डल्ला मारला आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली असून हि चोरीची घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. दरम्यान या प्रकरणी दादर पोलिसांनी आरोपीला बोड्या ठोकल्या असून इतर काही लोक देखील या चोरी प्रकरणात सहभागी असल्याची शक्यता आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धीविनायक मंदिर पुजारी कक्षात असलेल्या दानपेटीतून १० हजार रुपयांची चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. मंदिर प्रशासनाच्या एका महिला पदाधिकारीला हे प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसला, परिणामी त्यांनी या गंभीर प्रकारची माहिती वरिष्ठांकडे दिली. त्यांनतर मंदिर प्रशासनाने मागील ८-१० दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या घटनेचं सत्य समोर आलं. येथील कामगारच चोरी करत असल्याची माहिती या सीसीटीव्हीच्या माध्यमातून उघडकीस आलीय. तर सातत्याने हा प्रकार घडत असल्याची माहिती आहे. तर या चोरीच्या घटनेत आणखी ५-६ जणांचा सहभाग असल्याचा संशय आहे. सध्या त्या दिशेने पोलिसांचा तपास असून यातील मुख्य आरोपीला दादर पोलिसांनी अटक करत पुढील कारवाई सुरु केली आहे.

दरम्यान, या चोरीच्या घटनेत कर्मचाऱ्याने बोटाच्या कैचीने पुजारी कक्षात असलेल्या दानपेटीतून पैसे काढत असल्याचे दिसून आलं आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने चोरीचा भांडाफोड झालाय. दरम्यान, आरोपी कर्मचाऱ्याला पोलिसांनी ३ दिवसांची कोठडी सुनावली असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरु आहे. यातील कर्मचाऱ्याने गुन्हा कबूल केल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. सध्या या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे? कर्मचारी याआधी देखील पैसे काढत होता का? त्याने पैसे काढले असतील तर त्याच्याकडे चोरीच्या पैशांची किती रक्कम जमा आहे? इत्यादी अनेक प्रश्न आता या निमित्याने उपस्थित केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon