पाठलाग हा गंभीर गुन्हा; भीती न बाळगता तक्रार करा — ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे

Spread the love

पाठलाग हा गंभीर गुन्हा; भीती न बाळगता तक्रार करा — ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : महिला आणि मुलींवरील पाठलाग (स्टॉकिंग) हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून तो कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा ठाम इशारा ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिला. ‘नर्चर सेल्फ फाउंडेशन’तर्फे आयोजित महिला दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते.

महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी आयोजित या कार्यक्रमात नागरिकांच्या विविध शंकांचे निरसन करताना आशुतोष डुंबरे यांनी स्पष्ट संदेश दिला की, “भीती न बाळगता त्वरित तक्रार करा. ठाणे पोलीस तुमच्या सोबत आहेत.” पाठलाग, ऑनलाईन छळ, धमक्या यांसारख्या प्रकारांकडे दुर्लक्ष न करता तत्काळ पोलीसांकडे धाव घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी उपस्थित महिलांना कायदेशीर हक्क, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया आणि उपलब्ध हेल्पलाईन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, सोशल मीडियावर होणाऱ्या छळवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबतही माहिती देण्यात आली.

महिलांच्या सुरक्षेबाबत ठाणे पोलीस दल सतत सतर्क असून, अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा पुनरुच्चार करत “आपल्या सुरक्षिततेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत,” असेही ठाणे पोलीस आशुतोष डुंबरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon