कल्याणमध्ये गाड्या चोरी करणाऱ्या चोरट्याला बाजारपेठ पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Spread the love

कल्याणमध्ये गाड्या चोरी करणाऱ्या चोरट्याला बाजारपेठ पोलीसांनी ठोकल्या बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर

कल्याण – एक तरुण बाईक चोरायला आला आहे असा फोन एका पोलीस कर्मचाऱ्याला आला. त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं आणि संशयित तरुणाला ताब्यात घेतलं. शाहरुख हुसेन असं या आरोपीचं नाव असून तो बाईकची चोरी करून त्यांची विक्री करायचा.उत्तर प्रदेशचा शाहरुख हुसेन हा चोरटा फक्त बाईक चोरण्यासाठी मुंबईला यायचा आणि पुन्हा गावी परत जायचा. परंतु, पोलिसांच्या कसून तपासामुळे या चोरट्याचा पर्दाफाश झाला असून त्याच्याकडून दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिम येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला एका खबरीचा फोन आला. त्यानंतर कल्याण पश्चिमेतील सुभाष मैदान परिसरात एक तरुण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.बाजार पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी प्रशांत आंधळे,पोलीस कर्मचारी प्रेम बागुल आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या परिसरात जाऊन याप्रकरणाची खात्री केली.दरम्यान, पोलिसांना तपासादरम्यान, एक तरुण त्या ठिकाणी संशयितरित्या दिसला.

हा तरुण आपली दुचाकी स्टार्ट करण्याच्या प्रयत्न करीत होता मात्र दुचाकी स्टार्ट होत नव्हती. पोलिसांनी या तरुणाशी विचारपूस केली. पण तरुणाने पोलिसांना उलटसुलट उत्तरं दिली.परंतु, पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तरुणाकडून धक्कादायक माहिती समोर आली. शाहरुख हुसेन असं या तरुणाचं नाव आहे. तो उत्तर प्रदेश येथील आग्र्याचा रहिवासी आहे. तो दुचाकी चोरीसाठी मुंबई आणि उपनगरात यायचा आणि लगेच गावी निघून जायचा. परंतु, पोलिसांनी या चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून चार दुचाकी जप्त केल्या आहेत. या चोरट्याने आतापर्यंत किती गाड्या चोरल्या आहेत, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon