धाराशिवमध्ये चुलत्यानेच १३ महिन्याच्या चिमुकलीचे तुकडे करुन जमिनीत पुरले; आरोपीला अटक

Spread the love

धाराशिवमध्ये चुलत्यानेच १३ महिन्याच्या चिमुकलीचे तुकडे करुन जमिनीत पुरले; आरोपीला अटक

योगेश पांडे / वार्ताहर

धाराशिव – धाराशिवमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. १३ महिन्यांच्या चिमुकलीचे चुलत्यानेच कोयत्याने तुकडे केले आहेत. धाराशिवच्या गवळेवाडी इथं ही धक्कादायक घटना घडली आहे. मुलीला अज्ञाताने पळवून नेल्याची वडिलांनी तक्रार दिली होती. पोलीस तपासात चुलत्यानेच पळवून नेल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चुलता शंकरेश्वर माने याने कोयत्याने चिमुकलीचे तुकडे केले आणि त्यानंतर पोत्यात भरुन जमिनीत पुरले होते. याप्रकरणी आरोपीकडून कबुली जबाब दिला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. तामलवाडी पोलिसांनी २४ तासात संशयित आरोपीला ताब्यात घेत, मृतदेहाचा शोध घेतला. भावाची पत्नी पर पुरुषासोबत पळून गेली होती, मुलगी भावाची नसल्याच्या संशयावरुन रागाच्या भरात चुलत्याने मुलीचा खून केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon