राज्यसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये राजकीय हालचाली
शरद पवार गटाला वगळून उद्धव ठाकरेंची थेट दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – राज्यसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात थेट चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या चर्चांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला बाजूला ठेवत दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडशी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू केली आहे. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांसाठी १६ मार्च २०२६ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी एका उमेदवाराला २७ मतांचा कोटा आवश्यक आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार महाविकास आघाडीकडे ५० आमदारांचे बळ आहे. त्यामुळे सात पैकी किमान एक जागा मविआला मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र त्या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार असणार यावरून आघाडीत अंतर्गत चर्चा सुरू झाली आहे.
सध्याच्या आकडेवारीनुसार महाविकास आघाडीकडे ५० आमदारांचे बळ आहे. त्यामुळे सात पैकी किमान एक जागा मविआला मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र त्या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार असणार यावरून आघाडीत अंतर्गत चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, विधानसभेतील संख्याबळ पाहता भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे राज्यसभेच्या ७ पैकी सुमारे ६ जागा महायुतीच्या खात्यात जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.