माणुसकीला काळिमा फासणारी घटना; सावत्र वडील- भावाकडून तरुणीवर वारंवार अत्याचार

Spread the love

माणुसकीला काळिमा फासणारी घटना; सावत्र वडील- भावाकडून तरुणीवर वारंवार अत्याचार

योगेश पांडे / वार्ताहर

मिरा भायंदर – मीरा रोडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वडील- मुलगी आणि भाऊ- बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारीच घटना मीरा रोडमधील नयनानगर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून रोष व्यक्त केला जात आहे. सावत्र वडीलांनी आणि भावाने एका तरूणीवर वारंवार जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित करत अत्याचाराची घटना घडली आहे. दोघांनीही तरूणीच्या इच्छेविरूद्ध शारीरिक संबंध ठेवत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणची पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीरा रोडमधील नयनानगरमध्ये एका २० वर्षीय तरूणाने आणि त्याच्या वडीलांनी आपल्या सावत्र बहिणीवर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नयानगर पोलिसांनी पीडितेचा सावत्र भाऊ आणि तिला धमकी देणाऱ्या सावत्र वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून पीडितेवर सावत्र भाऊ आणि वडीलांकडून बळजबरीने अत्याचार केला जात आहे. नयन नगरमधील एका इमारतीतील रूममध्ये ऑगस्ट २०२३ ते जानेवारी २०२६ या काळात त्या पीडितेवर सावत्र भाऊ आणि वडीलांकडून जबरदस्तीने अत्याचार केले जात होते. पीडितेच्या इच्छेविरोधात जबरदस्तीने अत्याचार केले जात होते. शिवाय, तिला वारंवार धमक्या देखील दिल्या जात होत्या.

२० वर्षांचा सावत्र भाऊ आणि वडील हे दोघेही त्या पीडितेच्या इच्छेविरूद्ध वारंवार तिच्यावर अत्याचार करायचे. याबद्दल घरात काहीही सांगू नको, नाही तर आम्ही तुला जीवंत मारून टाकू, घरखर्चाला सुद्धा आम्ही तुला पैसे देणार नाहीत, अशी धमकी त्या पीडितेला तिचा भाऊ आणि वडील द्यायचे. पण तरीही शेवटी त्या पीडितेने आईला सांगण्याचे धाडस केलेच. जेव्हा तिच्या आईने या संपूर्ण प्रकरणाबद्दल सावत्र वडीलांना विचारलं असता तेव्हा त्यांनी मदतीऐवजी त्या पीडित मुलीला आणि तिच्या आईलाच धमकावले. जर हा घडलेला प्रकार तुम्ही कोणाला सांगितला, तर तुमच्या दोघींनाही चाकूने जीवे मारून टाकेल, अशी धमकीच वडिलांनी दिल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे.

सततच्या त्रासाला कंटाळून पीडितीने अखेर २६ जानेवारी रोजी मीरा रोडच्या नयनानगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलीसांनी सावत्र वडील आणि मुलाविरोधात तक्रार दाखल केली आहे. संपूर्ण घटनेचा तपास सह पोलीस निरीक्षक पठाण यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. घटनेची पोलीस सखोल चौकशी करत असून दोघांविरोधातही कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कळते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon