संजय राऊत यांची तब्येत बिघडली; भांडूपच्या फोर्टिस रूग्णालयात दाखल

Spread the love

संजय राऊत यांची तब्येत बिघडली; भांडूपच्या फोर्टिस रूग्णालयात दाखल

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे खासदार तथा ज्येष्ठ नेते संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. संजय राऊत यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना आता उपचारासठी भांडूपच्या फोर्टिस रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या रूग्णालयात संजय राऊत यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत. राऊत यांनी काही दिवसांपूर्वी प्रकृतीत बिघाड झाल्याची आणि उपचार सुरु असण्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत आणखी बिघडली आहे.

दरम्यान, संजय राऊत हे प्रकृतीमुळे सार्वजनिक कार्यक्रमांपासून आणि जीवनापासून दूर आहेत. अशातच आता संजय राऊत हे रूटीन चेकअपसाठी फोर्टिस रूग्णालयात दाखल झाले असल्याची माहिती समोर आली आहे.बुधवारी आवश्यक त्या तपासण्या पूर्ण झाल्यानंतर संजय राऊत हे भांडूप येथील मैत्री निवास्थानी विश्रांती घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे माध्यमांपासून आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत. याबाबत त्यांनी एक पत्रक काढून माहिती दिली होती. या पत्रकात राऊत यांनी म्हटलं होतं की, ‘सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यासाठी नम्र विनंती जय महाराष्ट्र! आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरु आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन.

संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत माहिती समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील “लवकर बरे व्हा” अशा शब्दांत शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या. तसेच महाविकास आघाडीसह महायुतीतील अनेक नेत्यांनी त्यांच्यासाठी त्वरित प्रकृती सुधारणा होण्यासाठी प्रार्थना केली आहे. तर आमदार आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत “काळजी घे संजय काका! प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस आणि जिंकतोस. आत्ताही तेच होईल, याची खात्री आहे,” असं म्हटलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon