ठाणे पोलिसांचा अंमली पदार्थांवर मोठा हल्ला; ४४ लाखांचा “एमडी” जप्त, दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या!
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या दोन स्वतंत्र सापळा कारवायांमध्ये मोठी कामगिरी बजावली आहे. पोलिसांनी एकूण ₹४४.६६ लाख किमतीचा मेफेड्रॉन (एमडी) हा अंमली पदार्थ जप्त करून दोन आरोपींना अटक केली आहे.
पहिल्या कारवाईत ₹४०.६४ लाखांचा, तर दुसऱ्या कारवाईत ₹४.०२ लाखांचा असा एकूण ₹४४.६६ लाखांचा अमली पदार्थ हस्तगत करण्यात आला. ही कारवाई एन.डी.पी.एस. कायद्यान्वये करण्यात आली असून, आरोपींविरोधात पुढील तपास सुरू आहे.
ठाणे पोलीस दलाने शहरातील युवकांना अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त ठेवण्यासाठी कठोर आणि सातत्यपूर्ण मोहिम हाती घेतली आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर मोठा आळा बसण्याची शक्यता आहे.