“शौर्याचा मानाचा तुरा : पालघरचे SP यतिश देशमुख यांना विशेष सेवा पदक”
पालघर / नवीन पाटील
पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख (भापोसे) यांना शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि निर्धार यांचे उत्कृष्ट उदाहरण ठरल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (भापोसे) यांच्या हस्ते विशेष सेवा पदक प्रदान करण्यात आले.
गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त आणि आव्हानात्मक जिल्ह्यात तब्बल २ वर्षे ६ महिने कार्यरत राहून देशमुख यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना प्रभावी आळा घालण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक धाडसी मोहिमा राबवून शांतता प्रस्थापित करण्यात मोठे यश मिळाले. या कारवाईंमुळे नक्षल चळवळीच्या हालचालींवर निर्णायक परिणाम झाला.
१२ ऑगस्ट २०२५ रोजी हा सन्मान जाहीर होताच पालघर जिल्हा पोलीस दल आणि नागरिकांमध्ये अभिमानाची लहर पसरली. निस्वार्थ सेवा आणि शौर्यामुळे प्रेरणास्थान ठरलेले देशमुख यांचा हा सन्मान संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.