महामार्गावर सापळा; ३२.२० कोटींचा मेफेड्रॉन जप्त; भिवंडी गुन्हे शाखेची मोठी कामगिरी 

Spread the love

महामार्गावर सापळा; ३२.२० कोटींचा मेफेड्रॉन जप्त; भिवंडी गुन्हे शाखेची मोठी कामगिरी 

पोलीस महानगर नेटवर्क 

भिवंडी – ठाणे शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार अंमलीपदार्थ विक्रेत्यांविरोधात कारवाई करताना, गुन्हे शाखा घटक-०२, भिवंडीच्या पथकाने महामार्गावर सापळा रचून दोन सराईत आरोपींना वाहनांसह अटक केली. त्यांच्याकडून तब्बल ₹३१,८४,८०,००० किंमतीचा १७ किलो ९२४ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थासह एकूण ₹३२,२०,१०,१४० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुप्त माहितीच्या आधारे ०९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास, पूर्व द्रुतगती महामार्ग नाशिक–ठाणे वाहिनीवरील रांजनोली, भिवंडी बायपासजवळ आरोपी मेफेड्रॉन विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस पथकाला मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार ओम साई फॅमिली ढाब्यासमोर नाकेबंदी व सापळा रचून कारवाई करण्यात आली.

अटक आरोपींची माहिती

१. तन्वीर अहमद कमर अहमद अन्सारी (वय २३, राहणार भिवंडी) – याच्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर कार(एमएच-०२-सिपी-३७७०) मधून ११ किलो ७६३ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त.

२. महेश हिंदुराव देसाई (वय ३४, राहणार विठ्ठलवाडी, मुळगाव कोल्हापूर) – याच्या ताब्यातील बीएमडब्ल्यू कार (एमएच-०६-एएस-९९८१) मधून ४ किलो १६१ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त.

जप्त मुद्देमाल:

मेफेड्रॉन (एम.डी.) – १५ किलो ९२४ ग्रॅम, किंमत ₹३१,८४,८०,०००

स्विफ्ट डिझायर कार – ₹४,००,०००

BMW कार – ₹३०,००,०००

३ मोबाईल फोन – ₹२२,०००

रोकड – ₹८,१४०

दोन्ही आरोपींवर कोनगाव पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, १३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक आरोपींवर यापूर्वीही विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, आणखी आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहायक पोलीस आयुक्त शेखर चागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon