डोंबिवलीकरांच्या जीवाशी खेळ, रस्त्यावरील घाण पाण्यात धुवून सुरु आहे केळ्यांची विक्री

Spread the love

डोंबिवलीकरांच्या जीवाशी खेळ, रस्त्यावरील घाण पाण्यात धुवून सुरु आहे केळ्यांची विक्री

योगेश पांडे / वार्ताहर 

डोंबिवली – कोणत्याही मोसमात मिळणारं, स्वस्त आणि पौष्टिक फळ म्हणजे केळी. कोणत्याही शहरात जागोजारी केळ्यांची विक्री होत असते. आता श्रावण महिना सुरु झाल्यानं उपवासासाठीही केळ्यांची मोठी मागणी असते. त्याचवेळी केळी विक्रीचं एक धक्कादायक वास्तव डोंबिवलीमध्ये उघड झालं आहे. डोंबिवलीमध्ये हातगाड्यावरील केळी रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात काढून पुन्हा हातगाडीवर ठेवल्याचा व्हीडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या बाबत शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी राजेंद्र सावंत यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

या केळी रस्त्यावरील घाण पाण्यात पडल्यानंतर, केळी स्वच्छ पाण्यात धूवून विकण्यास त्यांनी विक्रेत्यांना सांगितलं होतं. त्यावर केळी विक्रेत्याने, ‘मेरा नुकसान हुआ है. वो तेरा बाप देंगा क्या?’ असे उद्धट उत्तर देत पुन्हा तीच केळी नागरिकांना विकल्याचा दावा त्यांनी केला आहे. डोंबिवली पश्चिमेतील गोकूळ बंगल्याजवळ राजेंद्र सावंत पायी जात असताना त्यांनी पाहिले की, एक हातगाडी चालक गाडीवर केळी घेऊन चालला आहे. त्याची काही केळी रस्त्यावर पडली. रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या घाण पाणयात पडलेली केली त्याने पुन्हा गाडीवर ठेवली. सावंत यांनी त्याला हटकले. ही केळी आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या मगच त्याची विक्री करा. मात्र केळी विक्रेत्याने सांवत यांचा सल्ला न मानता त्यांना उद्धट उत्तर दिले गाडी घेऊन पुढे निघून गेला. डोंबिवली पश्चिमेतील गोपी टॉकीज परिसरात केळी विकतो. त्यामुळे त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. वंत यांच्या धक्कादायक खुलाश्यानंतर एकच खळबळ उड्ली आहे. त्यामुळे, डोंबिवलीकरांनो तुम्ही केळी खात असाल तर ती स्वच्छ पाण्यात धूवून विकली जात आहे की नाही याची खात्री करावी, असं आवाहन सावंत यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon