धक्कादायक ! सख्या आईसोबत अनैतिक संबंध असलेल्या नराधम पित्याकडून ९ वर्षीय चिमुकलीची हत्या; आरोपी नराधम बापाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
सोलापूर – दक्षिण सोलापूरमधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीने सगळीकडे संताप व्यक्त होत आहे. सख्ख्या आईसोबतच अनैतिक संबंधाच्या या प्रकरणाने समाजमन सु्न्न झालेले असतानाच त्या पुढील घटनाक्रमाने सगळ्यांच्याच काळजाचा थरकाप उडाला आहे. मंद्रूप पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या कुसूर या गावात ही अत्यंत लाजीरवाणी घटना समोर आली आहे. या घटनेने गावात उलटसुलट चर्चा सुरू आहे. कुसूर येथे एक दिवसापूर्वी ९ वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यातून या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला आहे. स्वत:च्या आईसोबत असलेल्या अनैतिक संबंधाची वाच्यता होऊ नये म्हणून पोटच्या चिमुकल्या मुलीलाच संपवलं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील संताप आणि चीड आणणारी घटना समोर आली आहे.
ओगसिद्ध कोठे या आरोपी नराधम बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शुक्रवारी संध्याकाळी दक्षिण सोलापुरातील कुसूर गावात एका ९ वर्षीय चिमुकलीचा मृतदेह पोलिसांना जमिनीत पुरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. यावेळी पोलिसांनी आकस्मित मयत म्हणून नोंद करत मुलीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले तेव्हा गळा दाबून मुलीची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. आरोपीच्या पत्नीने याविषयीची सर्व हकिकत पोलिसांना दिली. मृत श्रावणी हिने बापाला आजीसोबत नको त्या अवस्थेत पाहिले होते, हा प्रकार तिने कोणाला सांगू नये यासाठी आरोपीने मृत श्रावणी हिला बेदम मारहाण देखील केली. शुक्रवारी नराधमाने पत्नी वनिता कोठे घरी नसल्याची संधी साधत स्वतःची मुलगी श्रावणी हिची गळा दाबून त्याची हत्या केली, त्यानंतर मृतदेह घराच्यासमोरच खड्यात पुरून ठेवला. मात्र गावातील पोलीस पाटील महानंदा पाटील यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले, पोलिसांनी प्रशासनाच्यासोबत शुक्रवारी संध्याकाळी हा मृतदेह खड्यातून बाहेर काढला होता. दरम्यान या घटनेनंतर मंद्रूप पोलीस ठाण्यात आरोपी ओगसिद्ध कोटे याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात भान्यासं १०३(१), २३८ नुसार गुन्हा नोंद करण्यात आली
आहे.