सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात, ७० हजारांची लाच भोवली
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – राज्यात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशीच एक घटना नाशिक परिसरात घडली आहे. ७० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. भाऊसाहेब गोविंद काळे असे लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांची नेमणूक सध्या एमआयडीसी पोलिस स्टेशन, ता. जि. अहिल्यानगर येथे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तोफखाना पोलिस स्टेशन कडील दाखल गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांच्या भावाने चोरीचे सोने विकत घेतले या कारणावरून आरोपी तक्रार न करण्याच्यासाठी आरोपी काळे यांनी तक्रारदार यांच्याकडे ७० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्या संदर्भात तक्रारदार यांनी लाप्रवी अहिल्यानगर येथे तक्रार दिली. त्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली असता काळे यांनी तक्रारदार यांचेकडे ७०हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यांच्यावर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.