कोळसे वाडी इमारत दुर्घटना प्रकरणी मालक कृष्णा लालचंद चौरसियाला कोळसेवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – चिकणी पाडा कल्याण पूर्व परिसरातील श्री. सप्तशृंगी को.ऑ.हौ. सोसायटी, शिवसेना ऑफिसच्या मागे, चिकणीपाडा, तिसगाव रोड, कल्याण पूर्व या ठिकाणी बिल्डिंगचा चौथ्या माळ्यावरील स्लॅप खाली तळमजल्यापर्यंत पडल्याने सदर सोसायटीत राहणारे नागरिकांपैकी ६ जखमी व ६ मयत झालेले आहेत.
मयतांची नावे
१) नमस्वी श्रीकांत शेलार, वय २वर्ष, राह. रूम नं १, पहिला माळा, सप्तश्रृंगी बिल्डींग, कल्याण पुर्व
२) सौ. प्रमिला कालीचरण साहु, वय ५६ वर्ष, राह. इंदिरानगर, मुंलुंड वेस्ट, मुंबई
३) सौ. सुनिता निलांचल साहु, वय ३८ वर्ष, राह. रूम नं २०१, दुसरा गाळा, सप्तश्रृंगी बिल्डींग, कल्याण पुर्व
४) सौ. सुजाता मनोज पाडी, वय ३२ वर्ष, राह. लोकसदर चाळ, रूम नं.१२, मलंगरोड, कल्याण
५) सौ. सुशिला नारायण गुजर, वय ७८ वर्ष, राह. सप्तश्रृंगी बिल्डींग, कल्याण पुर्व
६) व्यंकट भीमा चव्हाण, वय ४२ वर्ष, राह. शांतीधाम सोसायटी, चाळ नं.३, रूम नं ५, विजयनगर, कल्याण पुर्व
जखमीची नावे
१) विनायक मनोज पाधी वय ४ वर्ष, राह. रूम नं २, सदन चाळ, विजय नगर, कल्याण पुर्व
२) शर्विल श्रीकांत शेलार वय ४ वर्ष, राह. रूम नं ३०८, श्रीपाद परदेशी, आडीवली, ढोकाळी, कल्याण पुर्व
३) निखील चंद्रशेखर खरात वय २६ वर्ष रा रूम ००१, सप्तश्रृंगी बिल्डींग, कल्याण पुर्व
४) श्रद्धा निलांचल साहु वय १४ वर्ष राह. रूम नं २०१, सप्तश्रृंगी बिल्डींग, कल्याण पुर्व
५) अरूणा रोहीदास गिरनारायण, वय ४७ वर्ष, राह. सप्तश्रृंगी सोसायटी, चिकणीपाडा, कल्याण पुर्व
६) यश क्षिरसागर, वय १३ वर्ष, असे सहा नागरिक जखमी झालेले
सदर घटनेबाबत सचिन चंद्रकांत तामखेडे वय ३९ वर्षे, व्यवसाय नोकरी, (वॉर्ड अधिकारी ४ जे वॉर्ड, क. डो.म.पा.) यांनी दिलेल्या तक्रारी वरून कोळसेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा नोंद क्र. ३८६/२०२५ भा. न्या.सं. २०२३ चे कलम १०५,१२५ (अ) (ब) महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ४४ सह एकत्रीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (यूडीसीपीआर ) चे नियम २(२) प्रमाणे दि. २०/०५/२०२५ रोजी दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयात आरोपी कृष्णा लालचंद चौरसिया, वय ४० वर्षे, राह. रूम नं. ४०१, श्री. सप्तश्रृंगी को.ऑ.हौ. सोसायटी, चिकणीपाडा, कल्याण पुर्व यास दिनांक २०/०५/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरू आहे.