“अंमली पदार्थ विरोधी पथकाची उल्लेखनीय कारवाई; एम.डी. निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त, ३ आरोपी ताब्यात”
ठाणे – ठाणे शहरातील अंमली पदार्थ तस्करीवर आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे यांनी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलिस आयुक्त धनाजी क्षीरसागर आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल मस्के यांच्या नेतृत्वात अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. दि. १७ एप्रिल २०२५ रोजी मुंब्रा रेल्वे स्टेशनजवळ, देवेश कुमार रामकिशन शर्मा (रा. मथुरा, उत्तर प्रदेश) याला ३३६ ग्रॅम एम.डी. (किंमत रु. ६७.२ लाख) अंमली पदार्थासह अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान माहिती मिळाली की हा पदार्थ उत्तर प्रदेशातील कय्यूम नावाच्या व्यक्तीकडून मिळाला आहे.
त्यानंतर पोलिस पथकाने उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे जाऊन मोहम्मद कय्युम याचा शोध घेतला. तो ‘मारीया किड्स अँड लेडीज वेअर’ या दुकानाच्या मागे एम.डी. तयार करण्याचा कारखाना चालवत असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने पाच दिवस वेषांतरात राहून तपास केला. २७ एप्रिल रोजी पोलिसांनी स्थानिक स्पेशल टास्क फोर्सच्या सहकार्याने छापा टाकून मुख्य आरोपी मोहम्मद कय्युम आणि त्याचा साथीदार बिचपीन बाबुलाल पटेल (रा. अहमदाबाद) यांना अटक केली. छाप्यात ८१२ ग्रॅम एम.डी. (किंमत रु. १.६२ कोटी) आणि अंमली पदार्थ तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.
एकूण कारवाईत १ किलो १४८ ग्रॅम एम.डी. (किंमत रु. २.३० कोटी) हस्तगत करण्यात आला असून तीन आरोपींना अटक झाली आहे. ठाणे पोलिसांची ही कारवाई अंमली पदार्थांच्या विरोधात एक मोठे पाऊल मानले जात आहे. यामध्ये अटक आरोपी मोहम्मद कय्युम मोहम्मद युनुस हाशमी, गुन्हा क्रमांक २७०/२००० भारतीय दंड विधान कलम ३०७ (खूनाचा प्रयत्न), ५०४ (शांतता भंग), ५ (जीव देण्याची धमकी)
पोलीस ठाणे: रौनाही पोलीस ठाणे, तालुका सोहावल, जिल्हा अयोध्या, उत्तर प्रदेश यामध्ये अटक आरोपीवर गुन्हा क्रमांक १८८/२०२१, ३, एनडीपीएस (अंमली पदार्थ प्रतिबंधक) कायदा कलम ८, २२, २९, २७ (अ), ६०(३)
पोलीस ठाणे: इंदिरा नगर पोलीस ठाणे, लखनऊ, उत्तर प्रदेश गुन्हा क्रमांक ७०५/२०२२ २, इंडीपीएएस ७/७ कायदा कलम २२(क), २९
पोलीस ठाणे: नयानगर पोलीस ठाणे, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालय, जिल्हा ठाणे यामधील बिपीन बाबुलाल पटेल
संबंधित गुन्हातील
गुन्हा क्रमांक ०२/२०२,एनडीपीएस कायदा कलम २२(क) गुजरात राज्य पोलीस, दुसरा गुन्हा क्रमांक ६२/२०२४, एनडीपीएस कायदा कलम ८/२१ सी, २२ सी, २५, २७ ए, २१ विभागमहसूल गुप्तवार्ता संचालनालय, इंदौर झोनल युनिट, मध्य प्रदेश आदींचा समावेश आहे. सदर अंमली पदार्थ विरोधी कारवाई ही पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त (गुन्हे), अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंध) श्री. धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या यशस्वी कारवाईमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के, सपोनि निलेश मोरे, सपोनि जगदीश गावित, पो.उ.नि. नितीन भोसले, दीपेश किणी, राजेंद्र निकम, ग्रेड पो.उ.नि. मोहन परब, पोहवा हरीश तावडे, अमोल देसाई, हेमंत महाले, अनुप राक्षे, प्रमोद जमदाडे, गिरीश पाटील, अभिजीत मोरे, अजय सपकाळ, शिवाजी वासरवाड, विक्रांत पालांडे, शिवाजी रावते, नंदकिशोर सोनगिरे, हुसेन तडवी, शिल्पा कसबे आणि कोमल लादे. या कामगिरीत स्पेशल टास्क फोर्स, लखनऊ, उत्तर प्रदेश येथील पथकाचाही मोलाचा सहभाग होता. त्यामध्ये पोनि शिवनेत्र सिंह, पोनि विनय सिंह, पोउनि रामनरेश कनोजिया, पोउनि मनोज सिंह व पोहवा सुधीर सिंह यांचा समावेश होता. ही संयुक्त कार्यवाही अत्यंत नियोजनबद्ध, धाडसी आणि प्रभावी ठरली असून, संबंधित सर्व अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.