मुंबईतून आठ तृतीयपंथींना अटक;अटकेतील सर्व बाग्लादेशी नागरिक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईमधून मोठी बातमी समोर आली आहे, या बातमीनं खळबळ उडाली आहे. मुंबईमधून आठ तृतीयपंथी लोकांना अटक करण्यात आली आली आहे. मात्र त्यांची ओळख पटताच पोलिसांना देखील मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी ज्या आठ तृतियपंथी लोकांना अटक केली आहे, ते सर्व बाग्लादेशी नागरिक आहेत. आपली ओळख गुप्त राहावी, आपण पकडले जाऊ नये म्हणून ते मुंबईमध्ये लिंग बदलून राहत होते. मात्र पोलिसांनी अखेर त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून हे तृतीयपंथी लोक भारतामध्ये वास्तव्याला होतो. मुंबई पोलिसांकडून शहरात राहणाऱ्या बाग्लादेशी नागरिकांचा शोध सुरू आहे. याचदरम्यान ही मोठी कारवाई करण्यात आली आहे, मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. मुंबईमधून आठ तृतीयपंथी नागरिकांना अटक करण्यात आलं आहे. त्यांची ओळख पटताच पोलिसांना देखील धक्का बसला आहे. ते सर्व बांगलादेशी नागरिक असल्याचं समोर आलं आहे. आपली ओळख गुप्त राहावी, आपण पोलिसांच्या नजरेस पडू नये, यासाठी ते तृतीयपंथी बनून शहरात राहात होते. मात्र पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या नागरिकांना रफिक नगरमधून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं बैसाखी मो. शहाबुद्दीन खान (२४), मो. रिदोय मिया पाखी (२५), मारूफ इकबाल ढाली (१८), शांताकांत ओहीत खान (२०),बर्षा कोबीर खान (२२),मो. अफजल मोजनूर हुसेन (२२),मिझानुर इब्राहिम कोलील (२१) आणि शहादत आमिर खान (२०) अशी आहेत.