कर्जत तालुक्यात चोरी करून फरार झालेल्या सराईत टोळीतील एका चोरट्याला नेरळ पोलीसांनी भिवंडी येथून केली अटक

Spread the love

कर्जत तालुक्यात चोरी करून फरार झालेल्या सराईत टोळीतील एका चोरट्याला नेरळ पोलीसांनी भिवंडी येथून केली अटक

योगेश पांडे/वार्ताहर 

कर्जत – सराईतपणे चोरी करणाऱ्या टोळीतील एकाच्या नेरळ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. कर्जत तालुक्यात दिवसेंदिवस चोरीचं प्रमाpण वाढत जात असल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं होतं. चोरीच्या उद्देशाने आलेल्या या चोरट्याला भिवंडी परिसरात पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे. चोरट्याने चोरी करण्यासाठी वापरलेल्या टेम्पोमुळे या चोरीचा निष्कर्ष निघाला असून पोलिसांनी सीसीटिव्ही कॅमेरे यांच्या आधारे त्या चोरट्याला ताब्यात घेतले.मात्र त्या चोरट्याने वापरलेला टेम्पो देखील चोरीचा असल्याचे उघड झाले असल्याने आणखी एका चोरीची उकल यानिमित्ताने झाली आहे. नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१ (३),३३१ (४),३०७ (अ) हा गुन्हा २४ जानेवारी रोजी वाजता दाखल होता. शेलू येथील चोरीच्या गुन्ह्यात पाच लाकडी दरवाजे,दोन हॅमर मशिन,कटर मशिन,दोन राखाडी आणि हिरव्या रंगाच्या ड्रील मशिन,तीन ग्रॅडर मशिन, इलेक्ट्रीक केबलचा १०० फुट लांबीचा एक बंच तसेच आठ डोअर किट असलेले बॉक्स असा एकूण ४४,७५०/- रूपये किंमतीचा माल चोरीस गेलेला आहे.सदर गुन्हयाचा तपास सी.सी.टि.व्ही. फुटेजचे आधारे केला असता गुन्हयात संशयीत पिकअप गाडी कल्याण कडे जात असल्याने कर्जत हद्दीत असलेल्या चौकी तील सीसीटिव्ही कॅमेरे मध्ये दिसत होते.पुढे हा टेम्पो खडकपाडा येथे गेली असल्याचे दिसुन आल्याने त्याबाबत माहीती घेवुन पिकअप मालकाशी संपर्क साधला असता नमुद पिकअप चोरीला गेली असल्याने पोलिस देखील गडबडले.त्यानंतर कल्याण येथील खडकपाडा पोलीस ठाणे, येथे गुन्हा रजि.नं. ६९/२०२७ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल यांची माहिती नेरळ पोलिसांनी घेतली

चोरीला गेलेलं वाहनाचा सी.सी.टि.व्ही. च्या माध्यमातून शोध घेतला सदर वाहन हे उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे हद्दीत रोडला उभी असल्याचे दिसून आले. नेरळ पोलिसांनी त्या वाहनाचे कायदेशीर कारवाई करून ताब्यात घेण्यात आलेली आहे.त्यानंतर सदर भागातील तांत्रिकदृष्टया आणि सी.सी.टि.व्ही. फटेजच्या आधारे तपास केला असता पिकअप वाहन हे पडघा गावात एका रस्त्यालगत उभे केले असल्याचे दिसून आले.त्यावेळी तो टेम्पो जी व्यक्ती चालवत होती,त्या व्यक्तीची माहिती घेतली असता मोहम्मद आरीफ जुम्मन अहमद चौधरी हा भंगार विक्रेता चोरी मध्ये सक्रिय असल्याचे आढळून आले.या भंगार विक्रेत्याला येवले नाका येथून गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून ताब्यात रचून अटक केली. मोहम्मद आरीफ जुम्मन अहमद चौधरी हा आपला साथीदार अनिल विश्वकर्मा याचे मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. त्याचेकडून सदर गुन्हयात चोरलेला ४४,७७०/- रूपये किंमतीचे सर्व मुद्देमाल आणि गुन्हा करण्याकरीता वापरलेली अंदाजे १,५०,०००/- रूपये किंमतीचे पिकअप वाहन हे हस्तगत करण्यात आलेले आहे. शेलू येथील त्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्याकरीता आणि मालमत्ता हस्तगत करण्याकरीता गुन्हे प्रकटीकरण पथकाने साधारणतः ९० ते १०० सी.सी.टि.व्ही.फुटेज तपासून गुन्हा उघडकीस आणलेला आहे.सदर गुन्हयाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे,उपविभागीय पोलीस अधिकारी डी डी टेले,नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे परिविक्षधिन पोलीस उपनिरीक्षक संदिप फड,पोलीस हवालदार सचिन वाघमारे, पोलीस शिपाई राजेभाउ केकाण, आशु बेद्रे,निरंजन दवणे,विनोद वांगणेकर यांनी महत्वाची भूमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon