गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण ! अखेर वर्षभरानंतर ६व्या आरोपीला नाशिक मधून बेड्या

Spread the love

गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण ! अखेर वर्षभरानंतर ६व्या आरोपीला नाशिक मधून बेड्या

योगेश पांडे/वार्ताहर 

कल्याण – कल्याणमधील शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार प्रकरणात माजी आमदार गणपत गायकवाड यांना अटक झाली होती. परंतु या प्रकरणात इतर आरोपी काही वर्षापासून फरार आहेत. आता गोळीबार प्रकरणात फरार असलेल्या साहाव्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. नागेश बडेराव या आरोपीला कल्याण क्राईम ब्रँचने नाशिकमधून अटक केली आहे. उल्हासनगरमध्ये पोलीस स्टेशनमध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणात गणपत गायकवाड व इतर चार आरोपी आधीच जेलमध्ये आहे. परंतु गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड व आणखी एक आरोपी अद्याप फरार आहे.

२ फेब्रुवारी २०२४ रोजी उल्हासनगर पोलिस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता. त्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. महेश गायकवाड यांची प्रकृती गंभीर होती. त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्या घटनेतून ते बचावले. या प्रकरणात गणपत गायकवाड आणि इतर चार आरोपींना अटक झाली आहे. परंतु गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड अजूनही फरार आहे. या प्रकरणात फरार असलेला नागेश बडेराव याला गुरुवारी अटक झाली. दोन दिवसांपूर्वी महेश गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी वैभव गायकवाड याच्यावर अनेक आरोप केले होते. वैभव गायकवाड हा भाजपचा पदाधिकारी आहे. त्यामुळे पोलीस राजकीय दबावात काम करत आहेत. ज्या पोलिसांनी वैभव गायकवाड त्याला पकडले, त्यांना २५ हजारांचा पुरस्कार देण्याची घोषणा महेश गायकवाड यांनी केली होती. आरोपी आमदार महेश गायकवाड तळोजा कारागृहात आहे. परंतु ते अनेकवेळा पनवेल येथील फार्म हाऊसवर येतात, असा आरोप महेश गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्या आमदाराचे नाव मात्र महेश गायकवाड यांनी सांगितले नव्हते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon