चेंबूरचे छेडानगर बनले लॉज नगर, हजरत ख्वाजा गरीब नवाज कमेटी करणार आंदोलन
रवि निषाद/प्रतिनिधि
मुंबई – चेंबूर तिलक नगर पोलिसच्या हद्दीत असलेले छेड़ा नगर दिवसेंदिवस लॉज नगरी म्हणून आपली ओळख कायम केली आहे. या विरोधात येणाऱ्या २० जानेवरीपासून हजरत ख्वाजा गरीब नवाज वेलफेयर अशोशियन कमेटी आंदोलन करणार आहे. त्यासाठी कमेटी मार्फत सर्व संबंधित विभागामध्ये निवेदन देण्यात आले असल्याचे समजते.
चेंबूर एम पश्चिम वार्डच्या आणि तिलकनगर पोलिसचा हद्दीत येणाऱ्या छेडानगरमध्ये जवळपास २० लॉजिंग बोर्डिंग सुरू आहेत. त्यांच्याकडून तिलक नगर पोलिस आणि मनपाचे अधिकारी आपली कमाई करीत असल्याचे बोलले जात आहे. हजरत ख्वाजा गरीब नवाज कमेटीचे सचिव युसूफ उमर अंसारी यानी सांगतले की, सदर लॉज पोलिसांच्या देखरेखेखाली चालत आहे. या सर्व लॉजिंगमध्ये जे मुस्लिम नाहीत ते पण नकाब घालून येतात. ज्याचामुळे समाजात तेढ निर्माण होत आहे. कॉलेज, शाळकरी मुली देखील बिनदास्तपणे या लॉजमध्ये येत असतात. या सर्व प्रकारामुळे आपला समाज बदनाम होत आहे. येथील एकाही लॉजला हेल्थ लायसेंस नाही .सर्वच्या सर्व लॉज अवैधरित्या चालू आहेत. अंसारी यानी पुढे सांगितले की, जर २० जानेवरी पर्यन्त येथील लॉजवर कारवाई झाली नाही तर आमच्या कमेटीमार्फत आंदोलन करण्यात येईल ज्याची सर्व जवाबदारी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची असेल असा इशारा देण्यात आला आहे.