नवी मुंबईत हेडकॉन्स्टेबलची गळा आवळून हत्या; मृतदेह ट्रॅकवर फेकला

Spread the love

नवी मुंबईत हेडकॉन्स्टेबलची गळा आवळून हत्या; मृतदेह ट्रॅकवर फेकला

योगेश पांडे/वार्ताहर 

नवी मुंबई – नवी मुंबई शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे पनवेल रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये हेडकॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या विजय चव्हाण यांचा रबाळे ते घणसोली रेल्वे स्थानकादरम्यान जाणाऱ्या लोकलसमोर दोघांनी गळा दाबून हत्या केली. याप्रकरणी दोन्ही जणांविरुद्ध वाशी रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मयत विजय चव्हाण हे घणसोली येथे राहत होते. हेडकॉन्स्टेबल विजय चव्हाण यांना बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास रबाळे ते घणसोली रेल्वे स्थानकादरम्यान ठाण्याहून वाशीकडे जाणाऱ्या लोकलसमोर दोघांनी ढकलून दिले. याबाबत मोटरमनने लोहमार्ग पोलिसांना माहिती देताच रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी सदर घटनेतील मृत पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल विजय चव्हाण असल्याची माहिती समोर आली आहे. वाशी रेल्वे पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पीडितेचे नाव विजय रमेश चव्हाण ४२ असून तो घणसोली येथील रहिवासी आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon