मानखुर्द कुर्ला भंगार बाजारात तेल माफिया अली आणि सोहेल यांची दहशत
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – मानखुर्द पोलीस हद्दीतील मंडाला येथील भंगार बाजारात सध्या तेल माफिया पूर्णत: बळजबरी करून दररोज लाखोंच्या तेलाचा काळाबाजार करत असल्याचेही बोलले जात आहे. या तेल माफियांमुळे एका तरुणाला जीव गमवावा लागला होता. जे तेल माफिया तिथे हा व्यवसाय करत आहेत, त्यांचावर मानखुर्द सह अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. येथे तेल माफियांसाठी काम करणाऱ्या फिरोज नावाच्या तरुणाचा ज्वलनशील पदार्थाच्या संपर्कात आल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना या अगोदर घडलेली आहे. ती घटना तेल माफियांनी दडपल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. सोहेल, अली, राहत आणि रफिक हे मोठ्या ड्रममध्ये विषारी तेल आणि इतर ज्वलनशील पदार्थ घेऊन येतात असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे, या तेल माफियांचे गॉडफादर सोहेल अणि अली नावाचे लोक आहेत. मानखुर्द आणि इतर पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. चोरीचे तेल ते आपल्या कार्यकर्त्यांमार्फत उघडतात आणि नंतर ते विकतात, असे एका स्थानिक नागरिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. त्याना संरक्षण देण्याचे काम अली, सोहेल नावाचे लोक करतात. सूत्रानी सांगतल्याप्रमाणे त्यांना स्थानिक पोलिस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे संरक्षण आहे याचा फायदा घेत हे लोक स्थानिक रहिवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचे पोलिसांच्या विशेष सूत्रांचे म्हणणे आहे. या तेल माफियांनी आपल्या प्रभावाच्या जोरावर इथे तेलचा खेळ करत आहेत त्यामुळे संपूर्ण मानखुर्द परिसरात विविध प्रकारची चर्चा सुरू आहे. या संदर्भात पोलिस उपायुक्त नवनाथ ढवले यानी आपण लवकरात लवकर त्या लोकांवर कार्यवाही करू असे सर्व सांगितले आहे.