लाच घेतल्याप्रकरणी पंचायत समितीच्या तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, लाचलुचपतची कारवाई

Spread the love

लाच घेतल्याप्रकरणी पंचायत समितीच्या तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, लाचलुचपतची कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क

अहमदनगर – जिल्ह्यातील कर्जत पंचायत समितीच्या ३ कर्मचाऱ्यांना ३ हजार रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. एका ४२ वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीवर ही कारवाई करण्यात आली असून आरोपी लोकसेवक नामदेव दिगंबर कासले, वय ३१, पद कनिष्ठ लेखाधिकारी, वर्ग-३, पंचायत समिती कर्जत, ता.कर्जत, जि.अहमदनगर (मूळ रा. महेबूबनगर, काळेगाव रोड, अहमदपूर, ता.अहमदपूर, जि.लातूर) अनिल अंकुश भोईटे, वय ४१, पद ग्रामसेवक, वर्ग ३, सध्या नेमणूक आळसुंदे ता.कर्जत तत्कालीन नेमणूक कोंभळी, ता.कर्जत, जि.अहमदनगर रा. तिरुपती नगर, कर्जत, ता. कर्जत, जि.अहमदनगर व  दिपक नाना शेलार, वय ४३, पद ग्राम रोजगार सेवक, ग्रामपंचायत कोंभळी ता. कर्जत, जि.अहमदनगर रा.कोंभळी, ता.कर्जत, जि. अहमदनगर यांचा समावेश आहे.

तक्रारदार यांची कोंभळी, ता.कर्जत, जि.अहमदनगर येथे शेत जमीन आहे. तक्रारदार यांना वैयक्तिक विहीर खोदण्याकरता गटविकास अधिकारी, पंचायत समिती कर्जत यांचे कडून मान्यता मिळाली होती. त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत सदर विहीर खोदण्यासाठी तक्रारदार यांना पंचायत समिती कर्जत येथून चार लाख रुपये मंजूर झाले होते. सदरची रक्कम तक्रारदार यांना विहिरीचे झालेले कामाचे टप्प्यानुसार मिळणार होती. त्यानुसार विहिरीचे काम सुरू झाल्यानंतर आजपर्यंत सुमारे २,७५,६०२/- रुपये मिळालेले आहेत. तक्रारदार यांचे विहिरीचे काम पूर्ण झाले असून विहिरीचे मंजूर रकमेमधील उर्वरित रक्कम १,२३,९२४/- रुपये बाकी असून त्याबाबत तक्रारदार यांनी त्यांचे कोंभळी गावातील ग्राम रोजगार सेवक बाळू उर्फ दीपक शेलार यांची दिनांक २१/१०/ ३०२४ रोजी कोंभळी, ता.कर्जत येथे भेट घेतली होती. त्यावेळी ग्राम रोजगार सेवक शेलार यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचायत समिती कर्जत येथील कर्मचाऱ्यांसाठी तीन हजार रुपये लाचेची मागणी केल्याबाबतची तक्रार दि.२१/१०/२०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर येथे प्राप्त झाली होती. सदर लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने दि.२२/१०/२०२४ रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी दरम्यान ग्रामरोजगार सेवक शेलार यांनी पंचायत समिती कार्यालय कर्जत येथून तक्रारदार यांचे विहिरीचे कामाचे उर्वरित बिल मंजूर करण्याचे कामासाठी पंचायत समिती कर्जत येथील लोकसेवक नामदेव दिगंबर कासले, कनिष्ठ लेखाधिकारी यांच्यासाठी तसेच इतर कर्मचाऱ्यांसाठी पंचांचा समक्ष तक्रारदार यांच्याकडे तीन हजार रुपये लाचेची मागणी केली. लोकसेवक नामदेव दिगंबर कासले यांनी पंचा समक्ष सदरची लाच रक्कम स्वीकारण्याची संमती दर्शवून सदरची लाच रक्कम लोकसेवक शेलार यांच्याकडे देण्याची संमती दिली. व लोकसेवक आणि अंकुश भोईटे, ग्रामसेवक यांनी तक्रारदार यांना पंचा समक्ष सदरची लाच रक्कम देण्यास प्रोत्साहन दिले.

दिनांक २३/१०/२०२४ रोजी आयोजित सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक दिपक शेलार यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांचे कडून ३०००/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. तसेच इतर दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तिन्ही आरोपींविरुद्ध कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलिस निरिक्षक राजू आल्हाट,अजित त्रिपुटे, पोलीस उप अधीक्षक,पोलीस अंमलदार किशोर लाड, सचिन सुद्रुक, गजानन गायकवाड, उमेश मोरे, दशरथ लाड यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon