वसईतील भाजप उपजिल्हाध्यक्ष संजू श्रीवास्तव वर सामूहिक बलात्काराचा अचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
वसई – वसईतील अचोळे परिसरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. भाजप उपजिल्हाध्यक्षावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचोळे पोलीस स्टेशनच्या परिसरात राहणाऱ्या एका महिलेने भाजप उपजिल्हाध्यक्ष गंगेश्वरलाल श्रीवास्तव उर्फ संजू श्रीवास्तव यांच्यासह तीन जणांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २२ वर्षे महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार २०२१ मध्ये होळीच्या दिवशी दोन आरोपींनी तिला एका रिकाम्या खोलीमध्ये बोलावून कामाचे पैसे देतो असे सांगितल्यानंतर तिच्या कोल्ड्रिंग मध्ये अमली पदार्थ मिसळून तिला बेशुद्ध केले. त्यानंतर दोघांनी तिच्यासोबत सामूहिक बलात्कार केला. यावेळी गांगेश्वरलाल श्रीवास्तव उर्फ संजू श्रीवास्तव यांच्या कार्यालयात कर्मचारी विनय सिंघ व त्यांच्या पत्नी याठिकाणी उपस्थित होत्या.
आरोपी संजू श्रीवास्तव आणि विनय सिंघ यांनी महीले सोबत सामूहिक बलात्कार केला तसेच आरोपीच्या पत्नीने या संपूर्ण घटनेचा अश्लील व्हिडिओ बनवला. यानंतर आरोपीने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यासोबत वारंवार संबंध ठेवले. या संपूर्ण घटनेनंतर महिला दोन वेळा गर्भवती झाली. तसेच आरोपीने तिला गर्भपाताची औषधे देखील दिली. महिलेने आरोपीवर लग्नाचे आमिष दाखवण्याचा देखील आरोप लावला आहे तसेच या घटनेतील आरोपी मुळे तिला एक मुलगी झाल्याचं देखील तिचे म्हणणं आहे. या संपूर्ण घटनेमध्ये भाजप उपजिल्हाध्यक्ष संजय श्रीवास्तव यांचं नाव समोर येत आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.