धक्कादायक ! ठाण्यात तरुणाची हत्या करून मुंडकच छाटलं, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – राज्यात कायदा सुव्यवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. महिला, अल्पवयीन मुली यांच्यावर अत्याचार, खंडणी, खून, लूटमार यासारखे अनेक गुन्हे घडत आहेत. अशीच एक घटना ठाणे परिसरात घडली आहे. ठाण्यातील पॉश लोकल लोढा आमरा येथे एका सुरक्षा पर्यवेक्षकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ठाण्यातील कापूरबावडी परिसरात थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. येथील कोलशेत रोडवर असलेल्या हायफाय लोढा अमारा रहिवाशी संकुलातील एका सुरक्षा पर्यवेक्षकाची मुंडकं छाटून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ३५ वर्षीय तरुणाची हत्या करून त्याचं मुंडकच छाटल्याची धक्कादायक घटना घडली आहे तसेच, हत्येनंतर मुंडके छाटून ते मृतदेहा शेजारीच ठेवण्यात आलं होतं. इमारतीच्या टेरेसवर ही हत्या करण्यात आली. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता आणि मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ सातगिरे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. तो सोसायटीत मुख्य सुरक्षा अधिकारी होता. या प्रकरणी पोलिसांना त्याच्याच साथीदारावर संशय व्यक्त केला आहे. सोमनाथ हा सोसायटीत मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याच्याच साथीदाराने ही हत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे. प्रशांत कदम या तरुणाने हत्या केली असावी असा कयास लावला जात आहे. दरम्यान, हत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेने ठाण्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.