उत्तर प्रदेशातील मदरसामध्ये नकली नोटा छापण्याच्या कारखान्यावर पोलीसांची कारवाई; मौलवीसह चौघांना अटक

Spread the love

उत्तर प्रदेशातील मदरसामध्ये नकली नोटा छापण्याच्या कारखान्यावर पोलीसांची कारवाई; मौलवीसह चौघांना अटक

योगेश पांडे / वार्ताहर 

प्रयागराज – उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या महाकुंभ मेळाव्याची जोरदार तयारी सुरु आहे. महाकुंभामुळे राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर कामेही सुरु आहेत. त्याचवेळी प्रयागराजमध्ये नकली नोटांचा एक कारखाना मिळाला आहे. हा कारखाना मदरसामधील एका खोलीत सुरु होता. मदरसातून विद्यार्थी गेल्यानंतर कारखान्यात शंभर, शंभर रुपयांच्या नोटांची छपाई सुरु होत होती. रात्रभर या ठिकाणी छपाईचे काम होत होते. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर छापा टाकून चौघांना अटक करण्यात आली. त्यात मदरसाचा प्रभारी प्राचार्य मौलवी मोहम्मद तफसीरुल आरीफीनसह मोहम्मद अफजल, मोहम्मद साहिद आणि मास्टर माइंड जाहीर खान उर्फ अब्दुल जाहीर यांचा समावेश आहे. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणावर नकली नोटा आणि नोटा छापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. प्रयागराजमधील सिविल लाइस पोलिसांनी सांगितले की, शहरात नकली नोटा छापल्या जात असल्याची गोपणीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली. नकली नोटा छापण्याची धागेदोरे एका मदरसापर्यंत आले. सर्व पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी मदरसामध्ये छापा टाकला. त्यावेळी एका खोलीत नोटांची छापाई सुरु होती. पोलिसांनी मदरसाच्या मौलवीसह चार जणांना अटक केली आहे. त्या ठिकाणावरुन स्कॅनर, प्रिंटिंग मशीन आणि १००-१०० रुपयांच्या १ लाख ३० हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. मदरसामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून नकली नोटा छापण्याचा कारखाना सुरु होता. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेचे कलम १७८,१७९, १८० १८१, १८२ (१) नुसार गुन्हा दाखल केला आहे. चार आरोपींना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे.

नकली नोटाच्या या रॅकेटचा संबंध आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटनांसोबत असण्याची शक्यता आहे. आरोपींच्या फोनच्या ब्राउजिंग हिस्ट्रीमध्ये महाकुंभसंदर्भात लिंक मिळाले आहेत. प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभात नकली नोटा मोठ्या प्रमाणावर चलनात आणण्याची तयारी आरोपींनी केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपीत मौलवी मोहम्मद तफसीरूल ओरिसामधील रहिवाशी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon