आमिषाला बळी पडून पळून गेलेल्या तरुणीला राजस्थानमधून आणले परत
पोलीस महानगर नेटवर्क
नवीन पनवेल – उलवे येथील १९ वर्षीय मुली सोबत इंस्टाग्राम वर मैत्रीचे संबंध वाढवून ती राजस्थानला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. उलवे येथील संकल्प घरत सामाजिक संस्थेने एन आर आय सागरी पोलिसांच्या मदतीने या तरुणीला सुखरूपपणे घरी आणले आणि तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. १९ वर्षीय तरुणी उलवे येथे राहत असून एका तरुणाने इन्स्टाग्राम वर तिच्याशी मैत्री केली. त्या दोघांमध्ये चॅटींग सुरू झाली. यातूनच समोरील व्यक्तीने या तरुणीला सहा हजार रुपये पाठवले आणि राजस्थानला येण्यास सांगितले. त्या तरुणीने थेट राजस्थान गाठले. घडलेला सार्या प्रकाराची माहिती मुलीच्या वडिलांनी एन आर आय सागरी पोलीस ठाण्याचे वपोनी सतीश कदम यांना आणि संकल्प घरत सामाजिक संस्थेला देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. तरुणीकडील मोबाईलचे सीडीआर रेकॉर्ड काढण्यात आले. सामाजिक संस्थेचे संकल्प महादेव घरत, आकाश देशमुख, अजय हेगड़कर, नरेंद्र देशमुख, प्रकाश मुंढ़े यांनी किरण स्वार या पोलिसांना घेऊन थेट राजस्थान – उदयपूर गाठले. त्यांनी एका खेडेगावात जाऊन पाहणी केली असता ती मुलगी त्या ठिकाणी सापडली. सदर मुलीला महाराष्ट्रात परत सुखरूप आणून तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.