मराठी माणसाला ‘नो एन्ट्री’ म्हणणाऱ्या कंपनीला ठाकरे गट व मनसेचा दणका, मालकाने मागितली माफी

Spread the love

मराठी माणसाला ‘नो एन्ट्री’ म्हणणाऱ्या कंपनीला ठाकरे गट व मनसेचा दणका, मालकाने मागितली माफी

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – मराठी माणसाला नोकरीत ‘नो एन्ट्री’ म्हणणाऱ्या कंपनीच्या मालकाने अखेर महाराष्ट्राची आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची माफी मागितली आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील मरोळ एमआयडीसी येथील आर्या गोल्ड कंपनीकडून प्रोडक्शन मॅनेजर या पदासाठी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मराठी माणसाला नो एन्ट्री असं या जाहिरातीमधून सांगण्यात आलं होतं. दरम्यान, या प्रकरणात महाराष्ट्रात नवनिर्माण सेना आणि ठाकरे गट आक्रमक झाल्यानंतर कंपनीच्या मालकाने महाराष्ट्राची माफी मागितली आहे. आर्या गोल्ड कंपनीचे मालक बंटी रुपरेजा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मराठी जनतेचा माफी मागितली आहे. बिगर महाराष्ट्रीयन माणसासाठी ही जागा असल्याचे जाहिरातीत स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच मनसे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दाखल होऊन कंपनीच्या मालकाचा चांगलाच समाचार घेतला. महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला नोकरी नाकारण्याचा प्रकार कंपनीकडून होत असल्याबाबत राज पार्टी यांनी आर्या गोल्ड कंपनीच्या मालकाला मनसे स्टाईलने जाब विचारला. त्यानंतर कंपनीच्या मालकाकडून माफी मागण्यात आली. शिवाय यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संपूर्ण महाराष्ट्राची देखील माफी मागावी, अशी मागणी राज पार्टे यांनी केली आहे.

इंडीड जॉब या वेब पोर्टरवरील प्रोडक्शन मॅनेजर ही जागा भरण्यासाठी केलेली जाहिरात वादग्रस्त ठरली आहे. या जाहिरातीत मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये असं म्हटलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झालाय. इंडीड जॉब ही जाहिरात सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालीये. मुंबईच्या मरोळ एमआयडीसी येथे आर्या गोल्ड या कंपनीत प्रोडक्शन मॅनेजरची जागा असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, मराठी माणसाने अर्ज करु नये, असे म्हटल्याने महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला आता यानंतर कंपनीला उपरती झाल्यानंतर शहरातील बदल केला असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, मनसे आणि ठाकरे गट आक्रमक झाल्यानंतर आर्या गोल्ड कंपनीबाहेर शंभर ते दीडशे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ता आर्या गोल्ड कंपनीमध्ये दाखल झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon