पोलीस कॉन्स्टेबल १२ हजारांसाठी लाचलुचपतच्या जाळ्यात, गुन्हा दाखल; श्रीरामपूर येथील घटना
पोलीस महानगर नेटवर्क
अहमदनगर – सरकारी कर्मचारी अनैतिक कामांसाठी पैशांची मागणी करीत असताना आपण कुठेतरी फसलो जाऊ शकतो याची यत्किंचितही कल्पना त्यांना नसणे हे दुर्दैव म्हणावं लागेल. श्रीरामपूर येथे एका पोलिस कॉन्स्टेबलला १२ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. अवैध मुरुम वाहतूक करणारा डम्पर पकडण्यात आला होता. या प्रकरणाच्या गुन्ह्यात नाव येऊ न देण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. यात १२ हजार रुपयांची रक्कम पोलिसांनी स्विकारली होती. रक्कम स्वीकारताना पोलिस कॉन्स्टेबल रंगेहात पकडले गेले. या घटनेनंतर पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तहसील कार्यालयाच्या परिसरातून डंप्पर चोरीला गेला होता. अवैद्य मुरुम वाहतुक केल्याची गुप्त माहिती मिळाली होती. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केली त्यानंतर डंप्पर पोलिसांच्या हाती लागला होता. पोलिस कॉन्स्टेबल रघुनाथ खेडकर यांनी लाच मागिलती होती. गुन्ह्यात नाव येणार नाही याकरिता कॉन्स्टेबल यांनी २० हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदाराने लाचलुचपत विभागानकडे तक्रार दाखल केली असता लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि कॉन्स्टेबल रघूनाथ यांना रंगेहात पकडले. कॉन्स्टेबलने श्रीरामपूर येथील एका निर्जन ठिकाणी बोलवून १२ हजार रुपयांचे पाकिट स्वीकारले होते. श्रीवास्तव यांनी कॉन्स्टेबल रघूनाथ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रघुनाथ यांना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.