ऑनलाइन आर्थिक फसवणूक; वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा

Spread the love

ऑनलाइन आर्थिक फसवणूक; वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे – ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याची घटना ठाण्यातून समोर आली आहे. शेअर्स मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक परतावा देण्याचे आमिष दाखविले. ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याची घटना घडल्यानंतर फिर्यादी सुदेश प्रभाकर भायदे, वय – ३५, वर्षे, याने वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुदेश प्रभाकर भायदे (३५ वर्षे), ऐरोली, नवी मुंबई यांना अनोळखी मोबाईलधारक व्यक्तीने कॉल करून शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर फिर्यादी यांना आरोपीने त्याच्या बँक खात्यावर एकूण ४,९८,०००/- रुपये रक्कम ऑनलाईन पाठविण्यास सांगून ती परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येतात फिर्यादी यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात मोबाइलधारक आरोपीविरुद्ध गुन्हा रजि. नं. || ४५७/२०२४ माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन २००० चे कलम ६६ (क), ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगताप हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon