वर्ध्यामध्ये नरेंद्र मोदींच्या सभेत कांग्रेसचा प्रचार? सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधी यांचे फोटो आणि पंजा चिन्ह

Spread the love

वर्ध्यामध्ये नरेंद्र मोदींच्या सभेत कांग्रेसचा प्रचार? सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधी यांचे फोटो आणि पंजा चिन्ह

योगेश पांडे / वार्ताहर 

वर्धा – राज्यात शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाच वर्ध्यामध्ये भाजपच्या सभेत कॉंग्रेसचा प्रचार होत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. वर्ध्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेतील खुर्च्यांवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा फोटो असल्याचं दिसुन आला. त्यामुळे वर्ध्यात उलटसुलट राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत राहुल गांधी आणि पंजा चिन्हाचा प्रचार होत असल्याचं दिसत आहे. यवतमाळनंतर तळेगाव येथील सभेत खुर्च्यांवर काँग्रेसचा प्रचार होत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकारामुळे भाजपच्या सभेत काँग्रेसचा प्रचार तर नाही ना? असा सवाल निर्माण होत आहे.

काही खुर्च्यांवरवरील राहुल गांधीचे फोटो स्टिकर काढले असले, तरी काही खुर्च्यांवर मात्र राहुल गांधी आणि पंजा चिन्ह स्पष्ट दिसत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वर्धा जिल्ह्यात होते . लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील तळेगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी सायंकाळी जाहीर सभा झाली.त्याकरिता जय्यत तयारी करण्यात आली होती.भाजप कार्यकर्त्यांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या खुर्च्यांवर चक्क काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या पंजा चिन्हाचे स्टिकर लावलेले असल्याने खळबळ उडाली .

तसेच खुर्च्यांवरील स्टिकर अर्धवट फाडले असले तरी काही खुर्च्यांवर मात्र स्पष्ट राहुल गांधी आणि पंजा चिन्ह दिसून येत होता . यावरून भाजपच्या सभेत काँग्रेसचे प्रचार तर सुरू नाही ना? अस प्रश्न पडत आहे. मोदींच्या सभेत राहुल गांधींचे फोटो झळकल्यामुळे मोठी खळबळ वर्ध्यामध्ये उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon