भाईंदर पूर्वेत सदनिकेची भिंत कोसळून दोघांचा मृत्यु तर एक गंभीर जखमी.
योगेश पांडे / वार्ताहर
भाईंदर – भाईंदरमधून मोठी दुर्घटना घडली आहे. भाईंदर पूर्वेच्या एका इमारतीच्या सदनिकेची भिंत कोसळली असून यात दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर एक गंभीर जखमी आहे. नवघर पोलीस ठाण्यासमोरील श्रीनाथ ज्योती बिल्डिंगमध्ये तळ मजल्यावर एका सदनिके़चे दुरुस्तीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आणि मजुरांना तात्काळ बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, मात्र दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे. हरिनाम चौहान – ५५ आणि मखनलाल यादव – २६ अशी मृत कामगारांची नावं आहेत. तर आकाश कुमार यादव जखमी असून शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.