
प्रेयसीच्या नादाने चोरल्या तब्बल १३ दुचाकी
१९ वर्षीय आरोपीस कल्याण गुन्हे शाखेने केली अटक
दिनेश जाधव : डोंबिवली
कल्याण डोंबिवली शहरात दुचाकी चोरीच्या घटना या सातत्याने होत होत्या त्याअनुषंगाने दाखल झालेल्या तक्रारीवरून कल्याण गुन्हे शाखा घटक – ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांच्यामार्गदशनखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक मोहन कळमकर यांच्या पथकाने सदर ठिकाणा वरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपीचा शोध सुरू केला.यातील आरोपी कोळेगाव मानपाडा याठिकाणी येणार असल्याची गुप्त माहिती कल्याण गुन्हे शाखा घटक -३ च्या पोलिसांना मिळाली असता पोलिस अंमलदार गुरुनाथ जरग, पोलीस हवालदार अनुप कामत, विनोद चन्ने, यांनी सदर ठिकाणी सापळा रचत शुभम पवार या १९ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मागील दोन वर्षात १३ दुचाकी चोरल्या असल्याचे कबूल केले. पोलिसांनी १६ लाख ५ हजार किंमतीच्या १३ दुचाकी विविध शहरातून हस्तगत केल्या असून विविध पोलीस ठाण्यातील १३ गुन्हे उघडकीस आणले आहे. तसेच आरोपी शुभम पवार हा प्रेयसीवर पैसे खर्च करण्यासाठी महागातील गाड्या चोरून विकत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.